संतापजनक! आईस्क्रीम विक्रेत्याने हस्तमैथुन करत फालुद्यात मिसळलं वीर्य, उडाली खळबळ, नेमकं काय घडलं?

कुल्फी आणि आइस्क्रीम स्टॉल चालवणाऱ्या एका व्यक्तीचं भयानक कृत्य समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील नेककोंडा मंडलमध्ये रस्त्याच्या कडेला ही घटना घडली आहे. याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे.

हा विक्रेता हस्तमैथुन करून आईस्क्रीम व फालुदाच्या भांड्यात वीर्य टाकताना दिसत आहे. हा प्रकार ऐकूनच चीड येत आहे. आंबेडकर सेंटरमध्ये ‘भैरुनाथ आईस्क्रीम कुल्फी’ नावाचा आईस्क्रीम स्टॉलवरील सेन्सॉर केलेले फुटेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतोय, तो म्हणजे, काय गरज होती? कशासाठी हे केलं गेलं आहे. दरम्यान, घटनेनंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आइस्क्रीमच्या या स्टॉलवर धाड टाकून सदर विक्रेत्याला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे.

त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. हा आईस्क्रीम विक्रेता मूळचा राजस्थानचा असून याचे नाव काळुराम कुरबिया असे आहे. त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी आयपीसी कलम २९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सध्या असे प्रकार वाढले आहेत. काही वर्षांपूर्वी एका पाणीपुरी विक्रेत्याने पाण्यात लघवी मिसळली होती. या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करून अनेकांनी संताप व्यक्त केल्या आहेत. या व्यक्तीला कठोर शिक्षा द्याच पण त्याआधी त्याने असं का केलंय हे शोधून काढने गरजेचे आहे. 

याबाबत पोलीस तपास करत असून याठिकाणी रोज अनेक लोकं या स्टोलवर येतात. यामुळे त्यांच्या मनात हे कृत्य आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे आहे. यामुळे याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.