देशात सध्या अनेक विकासाच्या आणि वेगवेळ्या प्रकारच्या गप्पा मारल्या जातात. मात्र अजूनही गरीब आणि सर्वसामान्य लोकांची परिस्थिती वाईट आहे. अजूनही उपचाराअभावी अनेकांचे जीव जातात. आता पतीच्या उपचारासाठी इंजेक्शनसाठी ३०० रुपये नसल्यामुळे एका महिलेला घाटी रुग्णालय परिसरामध्ये भीक मागितली.
या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय परिसरामध्ये घडली. मात्र एका नागरिकाच्या ही बाब लक्षात येतात त्याने गरजू महिलेला इंजेक्शन घेण्यासाठी मदत केली.
या रुग्णालयात अनेकदा रुग्णांना औषध उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. यामुळे अनेक गरजू रुग्णांना अडचणीला सामोरे जावे लागते. संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय हे रुग्णांसाठी आशेचा किरण म्हणून ओळखले जाते.
असे असताना याच ठिकाणी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याठिकाणी एक महिला रुग्णालय परिसरात रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांकडे पतीच्या उपचारासाठी पैशांची मदत मागत होती. मात्र तिला कोणी मदत करत नव्हते.
तिच्या पतीच्या सिटी स्कॅन आणि इंजेक्शनसाठी बाराशे रुपये खर्च येणार होता. महिलेकडे बाराशे रुपये नव्हते. तिने वैद्यकीय अधीक्षकांकडे चकरा मारल्या, मात्र तिला मदत मिळाली नाही. नंतर रोडवर ती पतीच्या उपचारासाठी पैसे कमी पडत आहेत, मला पैसे द्या, असे अनेकांना म्हणू लागली.
याठिकाणी असलेल्या किशोर वाघमारे या तरुणाच्या लक्षात आली ही बाब आली. नंतर त्याने महिलेला मदत केली. या घटनेमुळे सध्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.