IPL : सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये IPL ची जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढलं आणि हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना चेन्नईने एकाच दगडात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचा गेम केला.
असे असताना सगळीकडे धोनीचीच चर्चा होते. आयपीएलमध्ये खऱ्या अर्थाने जलवा पाहायला मिळाला तो धोनीचाच. धोनी कोणत्याही मैदानात गेला तरी चाहत्यांनी त्याचा जयघोष करायचे सोडले नाही. प्रतिस्पर्धी संघातील कर्णधाराला किंवा खेळाडूंना जेवढं प्रेम मिळालं नाही तेवढं धोनीला मिळाल्याचे पाहायला मिळाते.
चेन्नईच्या संघाने दमदार कामगिरी करत आयपीएल गाजवले आणि त्यांनी अंतिम फेरीत स्थान पटकावले. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर होता तो गजविजेता गुजरातचा संघ. सामना अतिशय जोरदार झाला. यामुळे कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
गेल्यावेळी अंतिम सामना चांगलाच थरारक झाला. रवींद्र जडेजाने अखेरच्या चेंडूवर फटका लगावला आणि संघाला जेतेपद पटकावून दिले. चेन्नईने यावेळी गुजरातचा पराभव केला. तसेच चेन्नईने यावेळी मुंबई इंडियन्सची एकाधिकारशाही मोडीत काढली.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या नावावर पाच जेतेपदं होती. पण यावेळी विजय मिळवत चेन्नईनेही पाचवे जेतेपद आपल्या नावावर केले. त्यामुळे एका दगडात धोनीच्या चेन्नई मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांना चांगलाच धडा शिकवला.
आता या सिजनमध्ये तो कशी कामगार करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धोनी या सिजनमध्ये देखील खेळणार आहे. अनेकांनी तो आता केवळ मार्गदर्शन करेल असे म्हटले होते. मात्र तो खेळणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.