Jaipur news : जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी पत्नी आणि प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
भरत मिश्रा असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपुर्वी फेसबुकवर पोस्ट करत भरतने याबाबत माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे की, पत्नीने माझी सर्व ठिकाणी बदनामी केली. मित्रांसोबत माझा वाद झाला.
मला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. गेल्या महिन्याच्या ९ तारखेला माझी पत्नी प्रेयसीच्या घरी गेली. ती प्रेयसीला वाईटसाईट बोलली. पत्नीचे ऐकून प्रेयसीदेखील मला त्रास देऊ लागली. आमच्यातला वाद वाढत गेला, असे त्याने म्हटले आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.
तसेच भरतने प्रेयसीसाठी नोटमध्ये म्हटले आहे की, तुझ्या फोनमध्ये माझा फोटो आहे. तो फ्रेम करुन माझ्या पार्थिवावर ठेव. मृतदेहाला अग्नी देण्याआधी पत्नी म्हणून तु सर्व विधी पूर्ण कर. तसेच तुझ्या पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे.
प्रियसीच्या उपस्थितीत भरतने स्वत:वर गोळी झाडली. पोलिसांना घटनास्थळी रिव्हॉल्वर आणि मोबाईल मिळून आला. आता कुटुंबियांनी प्रेयसी विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामुळे याचा तपास सध्या सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण कधी पासून सुरू होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसेच मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. यामधून तपास सुरू आहे.