जानकरांनतर आणखी एक मित्र मविपासून दूरावला, जयंत पाटलांचे प्रयत्न अयशस्वी, निवडणुकीत फटका बसणार

सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये आता मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास आघाडी सोबत जातील, त्यांना माढ्याची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू होती.

असे असताना त्यांनी महायुतीची वाट धरली. महायुतीने त्यांना परभणीची जागा दिली आहे. ही माहिती खुद्द जानकर यांनी दिली आहे. यामुळे आता ते पुन्हा एकदा भाजपसोबत गेल्याचे निश्चित झाले आहे. नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना सोबत घेण्याची तयारी महायुतीने सुरू केली.

त्यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. हातकणंगलेत मविआ राजू शेट्टींना पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू होती. पण आता वेगळ्याच घडामोडी घडत आहेत. राजू शेट्टी यांनी देखील आता स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. यामुळे जानकरांपाठोपाठ शेट्टीदेखील महाविकास आघाडीची साथ सोडणार का, असेही समोर येत आहे.

याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील म्हणाले की, हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आमच्यासोबत असावेत असे आम्हाला वाटत होते. पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतो. शिवसेना नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी, बैठका सुरू असल्याचे मला समजले.

राजू शेट्टी मविआसोबत येतील अशी अपेक्षा होती. पण सध्याचं चित्र मला दिसत नाही. आता त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला नाही तर मग आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आम्हाला त्या मतदारसंघात उमेदवार द्यावा लागेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

यामुळे आता राजू शेट्टी यांच्या विरोधात महाविकास आघाडी देखील उमेदवार देणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत अजून अंतिम निर्णय झाला नाही. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समोर येईल.