John Koum : जान कोम यांचे नाव तुम्ही कदाचितच ऐकले असेल, पण जेन त्याने बनवलेले प्रॉडक्ट आज जगभरातील लोक दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणात वापरतात. मोठ्या कष्टाने मोठ्या संघर्षाने त्यांनी हे कमवलं आहे. त्यांचा जन्म युक्रेनच्या कीव शहरात झाला. त्या काळात युक्रेन सोव्हिएत युनियनचा भाग होता.
पूर्व युरोपमध्ये साम्यवाद पसरल्यानंतर कोम यांच्या आईने अमेरिकेत स्थायिक होण्यास कुटुंबाच्या हिताचे मानले. घरची परिस्थिती पाहता जान कोम यांनी किराणा दुकानात ‘छोटू’ किंवा सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांची आई बेबीसिटर म्हणून काम करायची तर कोम किराणा दुकानात झाडू मारायचे.
त्यांनी सुरुवातीचे दिवस गरिबीत घालवणाऱ्या जान कोम यांनी असे उद्पादन बनवले ज्याचा आज जगातील २७० कोटींहून अधिक लोक वापर करतात. कोम यांना व्हॉट्सॲपचे जनक म्हटले जाते. त्यांच्या या उत्पादनाने जगभरातील संवादाचा मार्ग बदलला. एसएमएसला पर्याय म्हणून सादर करण्यात आलेले व्हॉट्सॲप केवळ मेसेजिंगच्या पलीकडे आता मेसेज, व्हॉइस आणि व्हिडिओ चॅटचे ॲप बनले आहे.
दरम्यान, जान कोम एप्रिल २०१८ पर्यंत व्हाट्सॲपचे सीईओ होते. त्याच महिन्यात त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि लवकरच फेसबुक बोर्डातूनही बाहेर पडणार असल्याचे सांगितले. यापूर्वी कोम यांनी याहूसोबत नऊ वर्षे काम केले आहे.
२०२३ मध्ये कोम फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत ४४ व्या क्रमांकावर असून अब्जाधीशांच्या यादीत ते १३० व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिकेत आल्यावर दोन वर्षांनी त्यांनी कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकायला सुरुवात केली.
यादरम्यान, ते एका मोठ्या हॅकिंग ग्रुपमध्ये सामील झाले, ज्यामध्ये सायबर सुरक्षेच्या युक्त्या शिकल्या. याचा त्यांना मोठा फायदा झाला. खूप हुशार असल्याने कॉलेज पूर्ण होण्यापूर्वी याहूने त्यांना ऑफर दिली आणि त्यांनीही अभ्यास करण्याऐवजी नोकरी करण्याचे ठरवले.