केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या अधिवेशनात काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. बुंदेलखंडातील कलावती या महिलेची भेट घेऊन गरीबीची कहाणी त्यांनी संसदेत सांगितली होती. पण त्यांना मोदी सरकारने मदत केली, असे अमित शहांनी सांगितले आहे.
राहूल गांधी यवतमाळ जिल्ह्यातील त्या महिलेला भेटले आणि त्यांची मदत केली. असा दावा काँग्रेसने केला होता. पण त्याला प्रत्युत्तर म्हणून अमित शहा म्हणाले की, काँग्रेसने त्यांना काहीच मदत केली नाही. त्यांना फक्त मोदी सरकारने मदत केली होती. आता याप्रकरणावर स्वत: कलावतींनी प्रतिक्रिया दिली आहे.
कलावती बांदूरकर यांनी अमित शहांना खोटं पाडलं आहे. मला भाजपमुळे कोणतीही मदत मिळाली नाही. राहूल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदलले. काँग्रेसने मला मदत केली, असे म्हणत कलावतींनी अमित शाहांच्या आरोपांमधली हवाच काढून टाकली.
राहूल गांधी बुंदेलखंडातील एका कलावती नावाच्या महिलेला भेटले. तिच्या वेदनांचे राजकारण केले. पण तिला मदत केली नाही. त्यावेळी वीज, घर, शौचालय, धान्य आणि औषधं मोदी सरकारने त्यांना उपलब्ध करुन दिली होती, असे अमित शहांनी म्हटले होते.
कलवाती या जळका येथील एका शेतकरी कुटुंबातील आहे. राहूल गांधींनी भेट घेतल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली होती. घर, वीज, पाणी आणि जगण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची मदत त्यांना करण्यात आली होती.
आता अमित शाहांच्या वक्तव्यावर कलावतींनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, राहूल गांधी यांच्यामुळेच मला सन्मानाने जगता येत आहे. त्यांनी मला भेट दिल्यानंतरच मला मदत मिळाली. काँग्रेसने मला मदत केली. याचा भाजपशी काहीही संबंध नाही. अमित शहा खोटं बोलताय.