सध्या ज्योती मौर्य ही देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. तिने १३ वर्षे नवऱ्याबरोबर संसार केला. नवऱ्याने तिला शिकवून मोठं अधिकारी बनवलं. पण अधिकारी बनल्यानंतर तिने दुसऱ्या एका अधिकाऱ्यासोबतच अफेअर केलं. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
असे असतानाच असेच एक प्रकरण आता मध्य प्रदेशातून समोर आले आहे. कमरु आणि ममता असे या जोडप्याचे नाव आहे. हे दोघे मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात राहत होते. कमरु हा मोलमजूरी करत होता.
कमरुला शिकण्याची खुप आवड होती. पण त्याला नोकरी मिळत नसल्यामुळे तो मोलमजूरी करत होता. पण ममताने त्याला शिकण्यात मदत केली त्याला चांगली नोकरी मिळण्यात मदत केली. पण आता त्याच कमरुने तिला बाजूला लोटून दुसरं लग्न केलं आहे.
१६ वर्षांपूर्वी तिचं पहिलं लग्न झालं होतं. जेव्हा तिचं मुल अडीच वर्षांचं होतं. तेव्हा तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. त्या लहान मुलाला ती एकटीच सांभाळत होती. पण मुलगा १५ वर्षांचा झाल्यावर त्याचा सुद्धा मृत्यू झाला. तिलाही आयुष्यात पुढे काही दिसत नव्हतं. असं असतानाच तिच्या आयुष्यात कमरु आला.
त्या दोघांनीही लग्न केले. दोघांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. कमरुचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. पण त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे ममताने त्याच्या शिक्षणाची जबाबददारी घेतली. नवरा बायकोच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो हे अनेकदा बघितलं असेल पण याप्रकरणात एका बायकोन नवऱ्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती.
नवऱ्याला शिकता यावं म्हणून ममता वाटेल ते काम करत होती. धुणं भांडे, साफसफाई, अशी लोकांची कामे ती करत होती. तिच्यामुळे कमरु २०२० साली व्यवसायिक कर अधिकारी म्हणून नियुक्त झाला. त्यानंतर तिने ममताला माहेरी पाठवलं. आपला पती नोकरी करतोय असंच ममताला वाटत होतं.
कमरु मात्र अधिकारी झाल्यानंतर पुर्णच बदलला. त्याचं बाहेर प्रेम प्रकरण सुरु झालं. तो तिच्यासोबतच राहू लागला. इतकंच नाही, तर त्याने प्रेयसीशी लग्न सुद्धा केलं. त्यानंतर ममताला हे कळताच तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सुनावणी करत कमरुला ममतासोबत राहण्याचे आदेश दिले आहे. तसेच सोबत राहण्याची इच्छा नसेल तर १२ हजार महिना तिला द्यावा लागेल, असेही सांगितले आहे.