सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाडने घेतली अलिशान कार; किंमत वाचून थक्क व्हाल

सा रे ग म प लिटिल चॅम्प्स हा शो खुप खास आहे. कारण या शोने महाराष्ट्राला अनेक गायक दिले आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमाचे अनेक सिजन्स येऊन गेले आहेत. पण या कार्यक्रमातील काही स्पर्धक हे प्रेक्षकांसाठी खुप खास बनले.

आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत यांना पंचरत्न म्हणून ओळखले जाते. या पाचही जणांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करुन ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत प्रेक्षक नेहमीच चर्चा करताना दिसून येत असतात.

सोशल मीडियावरही ते खुप सक्रीय असतात. आता कार्तिकी गायकवाडने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. तिने नवीन गाडी खरेदी केली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.

घरातील नवीन सदस्य असे कॅप्शन देत कार्तिकीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांनी या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे. नवीन गाडी खरेदी केल्याबद्दल चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे.

कार्तिकीने फॉर्च्युनर गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत ३० ते ३५ लाख रुपये आहे. कार्तिकीच्या वडिलांचा वाढदिवस होता. त्याच्या आदल्यादिवशीच तिने ही नवीन कार खरेदी करत वडिलांना सरप्राईज दिले आहे.

कार्तिकीचे तिच्या वडिलांवर किती प्रेम आहे, हे अनेकदा दिसून येत असते. ती अनेकदा तिच्या वडिलांबाबत सांगताना दिसून येत असते. आता या वाढदिवसाला तिने एक गाडी खरेदी केली आहे. तसेच डॅडी नावाचा एक टॅटूही तिने तिच्या हातावर काढला आहे. माझा पहिला टॅटू खास माझ्या वडिलांसाठी असे तिने म्हटले होते.