Kolhapur Crime : कोल्हापूरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मात्र या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरमधील छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील भेंडवडे गावात घटना घडली. काजल सलते आणि प्रियांशू सलते अशी मृतांची नाव आहेत. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याबाबत भुदरगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी पती, सासू, सासरा आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सासरचे तिला नाहक त्रास देत होते. यामुळे या त्रासाला ती वैतागली होती. यामुळे तिने हा टोकाचा निर्णय घेतला आहे.
याबाबत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सासरच्या लोकांची पैशांची मागणी पूर्ण होत नसल्याने काजल यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. घरात तिला रोज यावरून त्रास दिला जात होता. यामुळे घरात रोज वाद होत होते.
या त्रासाला कंटाळूनच काजल यांनी घरापासून जवळच असलेल्या विहिरीत दोन वर्षाच्या प्रियांशुला घेऊन उडी टाकली. याप्रकरणी पती अवधूत सलते याच्यासह चौघांना अटक केली आहे. घटनेमुळे माहेरच्यांना मोठा धक्का बसला.
मुंबईमध्ये फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगावा काजल यांच्याकडे लावला होता. सासरची परिस्थिती नसल्याने ही मागणी पूर्ण झाली नाही. सासरच्या लोकांची मागणी पूर्ण होत नसल्याने काजल यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.