राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. यामुळे महिला यासाठी अर्ज करत असून रक्षाबंधन दिवशी याचे पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच लाडका भाऊराया योजना या सर्व सामान्यांसाठी लागू करण्यात आल्या आहेत.
त्यातच आता लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याची मागणी होत असताना बारामतीमधून एक पोस्टर व्हायरल होत आहे. यामुळे याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. सासूबाईच्या जेवणावर सुनबाईचे जेवण फ्री असे या पोस्टरमध्ये म्हटले आहे. याची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे. यामुळे हे प्रकरण नेमकं आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या राज्य सरकारकडून निवडणूक जवळ आल्याने सर्वसामान्यांसाठी विविध योजना आणल्या जात आहेत. यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री भाऊ राव योजना या लागू करण्यात आल्या आहेत. असे असताना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका हॉटेल चालकाने लाडकी सुनबाई योजनेचे पोस्टर बनवले आहे.
यामध्ये या बॅनरवर सासूबाईंच्या जेवणावर सुनबाईचे जेवण फ्री, असे नमूद करण्यात आले आहे. सासूबाईला जेवायला घेऊन येणे आवश्यक सासूबाईला जी थाळी देणार तीच थाळी सुनबाईला फ्री मिळणार. घरांमधील कमीत कमी पाच लोकांना जेवायला मिळणार, असे म्हटले आहे.
सध्या सोशल मीडियावर या बॅनरची चांगले चर्चा असून राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांचा आधार घेऊन या हॉटेल चालकाने भन्नाट युक्ती लढवली आहे. आनंद सावंत असे हॉटेल चालकाचे नाव असून तो बारामतीचा राहणार आहे. यामुळे याठिकाणी लोकांची गर्दी होत आहे.
दरम्यान, या हॉटेलमधील योजनेची सगळीकडे चर्चा सुरू असून अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता राज्यातील योजना किती यशस्वी होणार हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.