माझं सोडा, मी ठाकरेंकडेच, तुमच्या मंत्रिपदाच काय झालं? विधानभवनात शिंदे, ठाकरेंचे आमदार भिडले…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नुकतंच एक दिवसाचं अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. यावेळी सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी आमदारांमध्ये संभाषण झालं. याचवेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचीही भेट झाली.

त्यांच्या संभाषणाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. चर्चा सुरू असतानाच शिरसाट यांनी वैभव नाईक यांना शिंदे गटात येण्याची ऑफर केली. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं. तुही त्यांच्या विरोधात बंड कर, अशी चिथावणी संजय शिरसाट यांनी दिली.

तसेच तू आमच्याकडे आल्यावर आपण दोघेही मंत्रीपदाची शपथ घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावेळी वैभव नाईक म्हणाले, तुम्ही शपथ कधी घेताय? संजय सिरसाट म्हणाले तू आला तर आमच्याकडे विस्तार होईल ना.

वैभव नाईक – मी येणार होतो ते राहूदे, आता तुमच्या शपथविधीच काय झाले ते सांगा? शिरसाट- तू आल्यावर आपण सोबत घेऊ ना, असा संवाद त्यांच्यात सुरू होता. नंतर वैभव नाईक म्हणाले, आम्ही सांगतो आहे की, उठाव केला त्या लोकांना दिलं पाहिजे. आम्ही काय कधी येणार नाही.

आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच. शिरसाट – नक्की, नाईक – शंभर टक्के नक्की. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार शिंदे यांना जाऊन मिळाले.

आमदारांपाठोपाठ खासदारांचा एक गटही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. सध्या निवडणुका तोंडावर आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे.