विधिमंडळात राडा! दादा भुसे अन् शिंदे गटाच्या आमदारात धक्काबुक्की, शंभूराज देसाईंनी तातडीने..

विधीमंडळाचा आज शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अजून कोणीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एकाच पक्षातील हे आमदार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले. यावेळी भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली. यामुळे पुढील घटना टळली. मात्र याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांनी एकमेंकांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याचे कारण अजून समोर आले नाही. विधीमंडळाच्या लॉबीमध्येच हा प्रकार घडला आहे. याबाबत अधिकृत कोणी माहिती दिली नाही.

या प्रकारानंतर शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांना यामध्ये मध्यस्थी केली. हा वाद कशावरून झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यावर आता विरोधक प्रतिक्रिया देत आहेत. शिंदे गटातून या प्रकरणावर सारवासारव केली जात आहे.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ज्या पद्धतीचा वाद या एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याचे समोर आलेले आहे, यावरुन राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत वादाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे या आमदारांसह सरकारवर टीका केली जात आहे. याबाबत याठिकाणी अजून कोण कोण उपस्थित होत याबाबत आता तपास केला जात आहे. मात्र सरकारकडून याबाबत कोणीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.