सध्या पावसाळा असल्यामुळे अनेक तरुण-तरुणी हे फिरायला निघातात. अनेकजण ट्रेकिंगसाठी गडकिल्ले शोधतात तर काही लोक हे धबधबे पाहायला जातात. पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी सिंहगड, तोरणा, तिकोणा, विसापूर, लोहगडसारखे किल्ले जवळ आहेत.
मोठ्या प्रमाणात लोक सिंहगडला जाताना दिसतात. पावसाळा सुरु झाल्यामुळे लोक आपल्या कुटुंबासोबतही सिंहगडावर येत आहे. पण आता सिंहगडाबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे लोकांना आता सिंहगडावर जाताना १० वेळा विचार करावा लागणार आहे.
सिंहगडाच्या पायथ्याशी बिबट्या आणि त्याच्या बछड्याचे दर्शन लोकांना झाले आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घेरा सिंहगडचे माजी सरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यावरुन ते फोटो घेण्यात आले आहे.
गावाच्या अगदी जवळ हा बिबट्या दिसून आला आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह ट्रेकिंग करणाऱ्या लोकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तिथे असणाऱ्या गावकऱ्यांना बिबट्यापासून सकर्त राहण्यास सांगण्यात आले आहे.
किल्ले सिंहगडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या मोरदरी गावच्या हद्दीत हा बिबट्या आढळून आला आहे. शिवानी यादव आणि गौरी यादव यांनी हा व्हिडिओ काढला आहे. व्हिडिओमध्ये दिसून येते की बिबट्या हा एकाच जागी बसलेला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात खेड, जुन्नर आंबेगाव परीसरामध्ये सर्रासपणे बिबट्या आढळून येतात. पण आता पुण्याजवळ असलेल्या सिंहगड परिसरातच बिबट्या आढळून आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी वारजे परिसरात बिबट्या घुसल्याची बातमीही समोर आली होती. त्यामुळे आता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.