Madhuri Dixit : सध्या देशात लोकसभा निवडणूक जवळ आली असून सर्वच पक्ष सध्या याची जोरदार तयारी सुरू करत आहेत. यातच भाजपने आपले उमेदवार देखील ठरवण्यास सुरुवात केली आहे. आता भाजपातर्फे अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चर्चा आहे.
माधुरीला मुंबईतून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात आणखी एक बॉलिवुड कलाकार दिसणार आहे. माधुरी दीक्षितला मध्य मुंबईतून भाजपातर्फे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली होती.
दरम्यान, या चर्चेनंतर माधुरी दीक्षित-नेने भाजपाच्या तिकिटावर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे कळत आहे. राज्यात भाजपाने लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी जोरदार रणनीती सुरू केली आहे. भाजपने देशव्यापी सर्वेक्षणही केले होते.
यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता होती. अमित शाह यांनी जून महिन्यात ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियाना अंतर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट देखील घेतली होती. यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल.
सध्या भाजपा नवीन लोकांना संधी देत आहे. उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पुनम महाजन यांच्या मतदारसंघातून माधुरी दीक्षित यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे याठिकाणी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.