राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीची ताकद महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगली आहे. त्यांना बरोबर घेण्याची माझीही वैयक्तिक इच्छा आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत राज्यातील हक्काचा एक मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची माझी इच्छा आहे.
यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर बरोबर आले तर त्यांचे स्वागतच आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायला हवे. प्रकाश आंबेडकर यांनी सहा जागा आमच्या निवडून येऊ शकतात. असे म्हटले आहे. यावर सगळे चर्चा करणार आहेत.
यावर पवार म्हणाले की, हो प्रकाश आंबेडकर यांची काही मतदारसंघात चांगली ताकद आहे. त्यामुळेच त्यांना बरोबर घेण्याची आमची इच्छा आहे. त्यांनी २७ जागांच्या ठिकाणी आमची ताकद असल्याचे पत्र महाविकास आघाडीला दिलेले आहे. यामुळे यावर लवकरच निर्णय होईल.
येत्या सहा व सात मार्च रोजी मुंबईत महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महत्त्वाचे बैठक होत आहे, यामध्ये ही चर्चा होईल. यावर अंतिम निर्णय देखील घेतला जाईल, असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, माढा हा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची आमची इच्छा आहे, असे पवार म्हणाले. यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.