महादेव जानकरांना चितपट करण्यासाठी पवारांनी हेरला तगडा शिलेदार, खुद्द होळकरच घेणार मोठा निर्णय…

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. शरद पवार आपला तगडा शिलेदार प्रचारासाठी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. होळकरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांचे नाव प्रमुख उपस्थितांमध्ये आहे. यामुळे आता पवार वेगळीच खेळी करणार असल्याची शक्यता आहे. भूषणसिंह होळकर शरद पवारांच्या वतीने महाविकास आघाडीसाठी प्रचार करणार का? हे लवकरच समजेल.

सध्या परभणीतून विद्यमान खासदार संजय जाधव पुन्हा रिंगणात उतरले आहेत. महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीला खो देऊन महायुतीमधून परभणीची उमेदवारी मिळवली. सुरुवातीला जानकर हे शरद पवार यांच्याकडून माढ्याचे उमेदवार असतील असेही सांगितले जात होते.

यामुळे आता धनगर मतांचे विभाजन होऊ शकते. म्हणून बारामती आणि माढ्याचा विचार करता भूषणसिंह होळकर यांचा शरद पवार आपल्या पक्षात प्रवेश करून घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. येणाऱ्या काळात याबाबत अधिकृत माहिती समोर येईल.

दरम्यान, भूषणसिंह होळकर हे काही दिवसात पक्षात प्रवेश करतील अशी माहिती आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार आणि बहुजन एकता ठेवण्यासाठी भूषणसिंह होळकर हे भाजपच्या विरोधात प्रचार करणार, असे भूषणसिंह होळकर यांनी सांगितले आहे.

यामुळे आता याठिकाणी रंगत वाढली आहे. महादेव जानकर यांना शरद पवार यांनी उमेदवार देणार असल्याचे सांगितले होते. मात्र ते महायुतीकडे गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.