---Advertisement---

महायुतीत बिघाडीला सुरवात! राष्ट्रवादीचा पत्ता झाला कट, शिंदेगटाच्या ‘या’ आमदारांचे मंत्रिपद निश्चीत

---Advertisement---

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची अनेक आमदार वाट पाहत आहे. शिंदे गटातील काही आमदारांनी जर जाहीरपणे आपल्याला मंत्रिपद मिळणार असल्याचे म्हटले आहे. पण आता सर्वांची प्रतिक्षा संपणार असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

अशात तीन आमदार असे आहेत, ज्यांचे मंत्रिमंडळात नाव येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर चौथ्या मंत्रिपदासाठी शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये स्पर्धा सुरु आहे. तसेच शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

भाजप आणि शिवसेनेमध्ये फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळात सात भाजपचे मंत्री शपथ घेणार आहेत. तर सात शिंदेंचे मंत्री शपथ घेणार आहे, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला तयार राहण्याचे आदेश दिले आहे, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरत गोगावले, अनिल बाबर आणि योगेश कदम यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.

तसेच चौथ्या मंत्रिपदासाठी संजय शिरसाट आणि योगेश रायमूलकर यांच्यामध्ये चुरस लागली आहे. त्यामुळे कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. संजय शिरसाटांनी अनेकदा जाहीरपणेे मंत्रिपदाबद्दल वक्तव्य करताना दिसले आहे.

संजय शिरसाट यांंना मंत्रिपद दिले जाणार की नाही यावरही सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच विदर्भाला प्राधान्य देण्यासाठी संजय रायमूलकर यांना संधी दिली जाण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिरसाटांचे मंत्रिपद जाऊ शकते असेही म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीला आणखी मंत्रिपदं दिली जाणार नाही. वर्षभरापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता वर्षभरानंतर हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---