Gadchiroli Crime : महाराष्ट्र हादरला! पोलिस पाटलाला गोळ्या घालून संपवलं; हत्येमागील कारण वाचून हादराल

Gadchiroli Crime : माओवाद्यांनी गोळ्या झाडून एका गाव पाटलाची हत्या केल्याची घटना गडचिरोली येथे घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लालसू वेळदा अंदाजे (वय ६०) असे हत्या झालेल्या गाव पाटलाचे नाव आहे. याबाबत धक्कादायक कारण समोर आले आहे.

लोह खाणीचे समर्थन करून ग्रामसभेतील विषयांची माहिती पोलिसांना देत असल्याचा आरोप करत माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. हत्येनंतर घटनास्थळी माओवाद्यांनी पत्रके टाकून त्यात लालसू हा सुरजागड लोह खाणीचे समर्थन करत असल्याने गाव पाटलाची हत्या केल्याचा दावा माओवादी गडचिरोली डिव्हिजन कमिटीने केला आहे.

दरम्यान, रात्रीच्या सुमारास सशस्त्र माओवादी आले आणि त्यांच्या कुटुंबियांसमोरच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. तसेच काही लोकांना माओवाद्यांनी आपल्यासोबत घेऊन गेल्याची माहिती समोर येत आहे. माओवाद्यांनी आदिवासी, जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी हक्काची लढाई लढत आहेत, असे म्हटले आहे.

तसेच हा आवाज दाबण्यासाठी काही लोक जनविरोधी काम करत आहेत. लवकर सुधरा अन्यथा जनता कधीही माफ करणार नाही, अशा शब्दात खाण समर्थकांना पत्रकातून इशारा दिला आहे. यातूनच ही घटना घडली आहे.

दरम्यान, हेडरी पोलीस ठाणे हद्दीतील टिटोळा येथील गाव पाटील असलेले लालसू वेळदा यांच्या घरी २३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सशस्त्र माओवादी आले आणि त्यांच्या कुटुंबियांसमोरच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. असे असले तरी इतर कोणाला धक्का लावला नाही.

या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. काही लोकांना माओवाद्यांनी आपल्यासोबत घेऊन गेल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे याबाबत पोलीस तपास करत आहेत.