कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने एक मोठा इतिहास रचला आहे. यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलं आहे. यामुळे त्याचे कौतुक होत आहे.
भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाचव्या दिवशी पदक मिळालं नाही. मात्र भारतीय खेळाडूंनी मेडलच्या दिशेने एक पाउल पडलं होतं. भारतीय खेळाडूंनी सातत्य राखले आणि भारताला पदक मिळण्याची संधी प्रत्यक्षात खरी ठरली आहे. स्वप्निल कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहात कांस्यपदकाला गवसणी घातलती.
या आलिम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलं आहे. यापूर्वी मनु भाकरने एकेरीत आणि मिश्रमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनमध्ये पदक मिळवणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यामुळे त्याचे कौतुक होत आहे.
दरम्यान, स्वप्निलच्या या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. स्वप्निल भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारा खाशाबा जाधव यांच्यानंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील आजचा सहावा दिवस आहे. आज भारताला 3 पदकं मिळवण्याची संधी आहे. यामुळे सर्व भारतीयांचे याकडे लक्ष लागले आहे. ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात पहिले पदक जमा झाले होते. आतापर्यंत भारताला फक्त कांस्य पदक मिळाले आहे.
त्यामुळे आता चाहत्यांना भारतीय खेळाडूंकडून सुवर्णपदकाची आशा लागली आहे. आता इतर सामन्यांकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील या खेळाडूने हे पदक जिंकल्याने आता राज्यातील खेळाडूंसाठी ही एक मोठी आनंददायी आणि अभिमानाची बाब आहे.