महाविकास आघाडी देणार जोरदार टक्कर! धक्कादायक सर्व्हे आला समोर, जाणून घ्या..

सध्या लोकसभेची जोरदार तयारी सुरू असून भाजपने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील याचा सर्व्हे इंडिया टुडे-सीएनएक्सने केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये म्हटले आहे की, भाजपप्रणित एनडीएला ३७८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडियाची मजल ९८ पर्यंत जाऊ शकते. इतर पक्षांच्या खात्यात ६७ जागा जाऊ शकतात. महाराष्ट्र राज्यात भाजपला २५ जागांवर विजय मिळू शकतात.

तसेच महायुतीत असलेली शिंदेंची शिवसेना ६, अजित पवारांची राष्ट्रवादी ४ जागा जिंकू शकते. यांची बेरीज केल्यास महायुती ३५ जागांवर विजय मिळवू शकते. महाविकास आघाडीचा विचार केल्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ८ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ३ आणि काँग्रेसला २ जागा मिळू शकतात.

यामध्ये महाविकास आघाडीला १३ जागांवर समाधान मानावं लागेल. मात्र उद्धव ठाकरे हे शिंदेंना वरचढ ठरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता अंतिम निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

दरम्यान, मागील निवडणूकीत शिवसेना-भाजप यांची युती होती. तर काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होती. यामध्ये शिवसेनेनं १८, भाजपनं २३ जागा जिंकल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीला ४, काँग्रेसला १, एमआयएमला १ जागा मिळाली होती.

यावेळी मात्र परिस्थिती खूपच बदलली आहे. सध्या बारामतीत पवार कुटूंबातच लढत होणार आहे. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक ठिकाणी सध्या जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.