मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला धक्का लागल्यामुळे एका पतीने रेल्वे स्टेशनवरच एक तरुणाला मारहाण केली आहे. त्यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. १३ ऑगस्टच्या दिवशी ही घटना घडली होती.
दिनेश राठोड (वय २६) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. तो नवी मुंबई येथील घणसोली येथील रहिवासी होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून त्या पती-पत्नीला ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची चौकशी ते करत आहे.
अविनाश माने असे त्या पतीचे नाव आहे तर शीतल माने असे त्या पत्नीचे नाव आहे. शीव रेल्वे स्टेशवर ही घटना घडली आहे. पती-पत्नी जिन्यावरुन खाली उतरत होते. त्यावेळी दिनेश राठोडही तिथून जात होता.
अशात दिनेशचा शितल यांना धक्का लागला. त्यावेळी त्यांनी त्याला थेट छत्रीने मारले. त्यानंतर अविनाशने हे बघितले. त्यामुळे त्यांनीही त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघे मारत असताना दिनेशचा तोल गेला आणि तो थेट रुळावर जाऊन पडला.
त्यावेळी एक लोकलने त्याला धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही सर्व घटना तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्यामुळे पोलिसांनी अविनाश माने आणि शीतल माने यांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.
याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. तसेच निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करत अविनाश आणि शीतल यांना अटक केली आहे. आता चौकशीनंतर पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार आहे. ते दोघेही कोल्हापूरचे रहिवासी आहेत.