मराठा आंदोलन अन् 100 कोटींची डील!! मनोज जरांगे यांच्या वक्तव्यामुळे राज्यात खळबळ

नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. सहा दिवस त्यांनी उपोषण केले. मंत्री शंभूराज देसाई यांनी एक महिन्यात सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे. यामुळे राज्य सरकारला या काळात निर्णय घ्यावा लागणार आहे.

असे असताना आता मनोज जरांगे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलनाच्या नावाखाली काही जणांनी 100 कोटी रुपये उकळल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. माझं नाव सांगून पैसे घेतले असतील तर त्यांच्या नावाची यादी माझ्याकडे द्या, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले, काही जणांनी नाव मला कळली आहेत. या आंदोलनाचा फायदा घेत माझं नाव सांगून कोणी कामं घेतली असतील तर त्याची यादी मला द्या. या आरोपामुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांची एक महिन्याची मुदत 13 जुलैला संपत आहे.

या मुदतीमध्ये मराठा आरक्षण तसेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही तर विधासभेतील 288 जागांवर उमेदवार उभे करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यामुळे आता या महिन्यात तरी त्यांचा प्रश्न मिटणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. माझं नाव सांगून ज्यांनी पैसे आणि कामं घेतली त्यांची मला यादी द्या, अशी मागणी उपोषणावेळी आलेल्या मंत्र्यांकडे जरांगे यांनी केली आहे.

तसेच वेळ आल्यावर त्या व्यक्तीचे नावही घेणार असल्याचा इशारा त्यांनी आज उपोषण स्थगित करताना दिला आहे. त्यामुळे 100 कोटी नेमके कोणी केले आहेत? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे. याचा तपास केला जात आहे.