अंबानींच्या लग्नातील डान्सगाणे पाहून मराठी अभिनेता भडकला, म्हणाला ह्या धनाढ्यांच्या लग्नातील..

सध्या अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. असे असताना त्यांच्या संगीत सोहळ्याबद्दल एका मराठी कलाकाराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबातील यानंतर अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडींग सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

या सोहळ्याला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. दिमाखदार प्री वेदडींग सोहळ्यानंतर आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याची. जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबर ते बॉलीवूडमधील भाईजान सलमान खान यांच्या डान्स परफॉर्मन्सने हा सोहळा चांगलाच गाजला.

संपूर्ण बॉलीवूड यामध्ये सहभागी झाले आहे. यावर आता मराठमोळा कलाकार सौरभ गोखलेने मिश्किल टिपण्णी केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. त्याने अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. स्टोरी पोस्ट करत सौरभ म्हणाला, आज एका धनाढ्य कुटंबातील लग्नसमारंभातील कुटुंबीयांचा नृत्याविष्कार पाहून मला माझ्या छोट्या नुमवि शाळेतील स्नेहसंमेलातील आमचा नाच आठवला.

फरक इतकाच की आम्ही ‘विद्यार्थी’ होतो आणि त्यांना ‘अर्थ-विद्या’ उत्तम येते! अशी पोस्ट करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दिमाखदार सोहळ्यात अनेक बडे नेते सेलिब्रिटी उपस्थित होते. रितेश-जिनिलियासह माधुरी दीक्षित देखील उपस्थित होते.

तसेच वर्ल्ड कप जिंकून आलेल्या भारतीय संघातील खेळाडूने देखील या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. अनेक परदेशी खेळाडू बडे उद्योजक देखील यावेळी उपस्थित होते. यामुळे या लग्नाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू झाली आहे. यावेळी मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. हा विवाह सोहळा कुटुंबाच्या अँटिलिया निवासस्थानी पार पडणार असायची माहिती समोर आली आहे. याची देखील जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.