मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा भाऊ बद्रीनाथ हा उपसरपंच झाल्याचे सांगितले आहे. यामुळे तिला आनंद झाला असून तिने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यासोबत तिने त्याचा गुलालाने माखलेला फोटो पोस्ट केला आहे.
फोटोत तो ग्रामदैवताचे आशीर्वाद घेतानाही दिसत आहेत. अश्विनी महांगडेचा भाऊ बद्रीनाथ महांगडे हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावाचा उपसरपंच झाला आहे. यामुळे तिला खूपच आनंद झाला आहे. अश्विनी महांगडे ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते.
सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने अनघा हे पात्र साकारले आहे. ती नेहमीच तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अनेक गोष्टींवर आपले मत व्यक्त करत असते.
आता अश्विनीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अश्विनीचा भाऊ बद्रीनाथ महांगडेची उपसरपंचपदी निवड झाली आहे. याबद्दल तिने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, बद्री तू फार संयमी बाबा.
शांत आणि फक्त शांत. तू आज पसरणी गावचे उपसरपंच म्हणून पदभार स्विकरल्याबद्दल अभिनंदन. तुझ्या हातून नानांच्या आशीर्वादाने उतमोत्तम कामे व्हावी. राजकारणाचा वसा देणाऱ्या नानांनी समाजासाठी कामी येणे किती महत्त्वाचे आहे हेच कायम मनी रुजवले.
आज या महत्त्वाच्या घटनेसाठी जे जे तुझ्यापाठी उभे राहिले त्यांची मी कायम ऋणी राहीन, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. चाहते यावर कमेंट करताना दिसत आहेत. हार्दिक अभिनंदन दादासाहेब, असे चाहते म्हणत आहेत. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.