नदीत बुडणाऱ्या तरुणांना माउलीने मोठ्या शिताफीने वाचवलं, नेसलेली साडी सोडली अन्..; माऊलीचे होतंय कौतुक

कोपरगामधील कारवाडी हंडेवाडी येथील रहिवासी असलेले शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे, अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे भावंडे नदीत मोटारी काढण्यासाठी गोदावरी नदीच्या पात्रात उतरले. यावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. पाणी वाढल्याने तीन्ही तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले.

यावेळी शेळ्या चारण्यासाठी मंजूर येथील रहिवासी असलेल्या ताईबाई छबुराव पवार आणि छबुराव बाबुराव पवार यांनी घटना पाहिली. यावेळी महिलेने जर धाडस केलं तर काय होतं? याचा प्रत्यय बघायला मिळाला. या नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांचा ताईबाई नावाच्या या महिलेने अंगावरील साडीच्या आधारे जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला.

यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून या तरुणांना वाचवणाऱ्या ताईबाईंचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या हिमतीमुळे या तरुणांचे प्राण वाचले आहे. दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधात पावसामुळे धरण 85% टक्के भरले. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात हळूहळू विसर्ग वाढवण्यात आला.

ही गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ताईबाई यांच्या मातृत्वाला जाग आली आणि त्यांनी कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीच्या आधारे त्याना वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

त्यातील दोघांना त्यांनी बाहेर काढले त्यात संतोष भीमाशंकर तांगतोडे हा तरुण वाढत्या प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृतदेह काढण्यात आला. दरम्यान, ताईबाई यांच्या धाडसाचं कौतुक हे सर्व स्थरावर होत आहे. त्यांच्यामुळे दोघे वाचले आहेत.

दरम्यान, ताईबाई यांनी दोन तरुणांचा जीव वाचवून केलेले काम हे कौतुकास्पद आहे. आजच्या युगातील महिलांना आदर्श घालून देण्याचे काम ताईबाई यांनी केले, असेही यावेळी तहसीलदार भोसले यांनी यावेळी सांगितले. तसेच या पावसात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.