राजकारण

मविआला पुन्हा धक्का! काँग्रेस आणि पवार गटाचे ‘हे’ बडे नेते भाजपात जाण्याच्या तयारीत?

सध्या राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले आहे. त्यांच्यासोबत काही आमदार असल्याचे सांगितले जात आहे.

त्यानंतर आता काँग्रेस आणि शरद पवार गटाचे दोन नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे असे झाल्यास शरद पवार यांना हा मोठा धक्का असणार आहे. जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या रंगल्यात आहेत.

अशोक चव्हाणांनंतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्यात. ते शरद पवार यांच्या सर्वात जवळचे मानले जातात. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी मंत्रिमंडळात काम केले आहे.

जयंत पाटील यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जयंत पाटील यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे. शरद पवार यांचा दावा हात म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील भाजपात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असे सूचक विधान केले आहे. मोदींना साथ देण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत असंही बावनकुळे म्हणालेत.

दरम्यान, येणाऱ्या काळात अनेकजण भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे हे। येते नेमकं कोण असणार हे लवकरच समजेल. अशोक चव्हाण हे भाजपात जाणार याची माहिती अगोदरपासूनच होती. अखेर त्यांनी प्रवेश केला आहे.

Related Articles

Back to top button