Mhada च्या गृहनिर्माण योजनेत बांधलेल्या पाच हजार ३११ घरांसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी, अर्जभरणा प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे. कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील योजनेत ही घरे बांधली आहेत.
यासाठी ‘गो लाइव्ह’ कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर ७ नोव्हेंबरला म्हाडाच्या वांद्रे पूर्वेतील मुख्यालयात सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. यामुळे तुम्हाला घर हवे असेल तर तुम्हीही यासाठी अर्ज करू शकता.
Mhada च्या घरांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया
त्यासाठी Mhada Housing Lottery System हे ॲप देण्यात आले आहे. तसेच https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जनोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे. याठिकाणी आजपासून अर्ज सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, कोकण मंडळाच्या घरांच्या सोडत प्रक्रियेत अर्जदार कुठूनही भाग घेऊ शकतात. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, हेल्प फाइल या संकेतस्थळावर आहेत.
तसेच ही लिंक १६ ऑक्टोबर रात्री ११.५९पर्यंत कार्यरत असणार आहे. १८ ऑक्टोबरला रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील. यामुळे ही एक चांगली संधी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे.
तसेच या सोडतीचा निकाल मोबाइलवर एसएमएस, ई-मेल, ॲपवर प्राप्त होईल. त्याच दिवशी सायंकाळपासून यशस्वी अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तसेच यामध्ये कोणाला काही शंका असल्यास किंवा अर्जदारांच्या अडचणी निराकरणासाठी ०२२- ६९४६८१०० हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. कोकण मंडळ सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक हजार १० घरे देखील उपलब्ध आहेत.
खुल्या बाजारातील किंमतीच्या तुलनेत फक्त अर्ध्या किंमतीत Mhada च्या घरांची किंमत असते. त्यामुळे घर घेणारांसाठी ही एक चांगली सुवर्णसंधी आहे. इतक्या स्वस्तात घर दुसरे कुठेही मिळू शकत नाही.