अल्पवयीन नातीने आजोबांची केली हत्या, गळा दाबून….! कारण ठरला मोबाईल…

मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीने आपल्या आजोबांची क्रूरपणे हत्या केली आहे. आजोबांनी हातातील मोबाईल फोन खेचून घेतल्याच्या रागातून नातीने आपल्या आजोबांना संपवले.

याबाबत माहिती अशी की, या मुलीने घरात हलवा तयार करुन त्यात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि हा हलवा आजोबांना खायला दिला. हलवा खाल्ल्यानंतर आजोबांना झोप आली. यानंतर तिने आजोबांना एका मोठ्या बॉक्समध्ये धक्का देऊन त्यांचा गळा आवळून हत्या केली.

या घटनेमुळे सगळेच हादरले असून याबाबत या मुलीला अटक करुन बालसुधारणा गृहामध्ये पाठवण्यात आलं आहे. 64 वर्षीय निवृत्त होमगार्ड असलेल्या व्यक्तीचा मृतदेह कृष्णा कॉलिनीमधील त्यांच्याच घरात एका बॉक्समध्ये सापडला. यामुळे मोठी खळबळ उडाली.

याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्तीची नात शेजारांच्या घराच्या छप्परावर लपून बसली होती. वडिलांचा मृतदेह सापडल्याची माहिती त्यांच्या मुलानेच पोलिसांना फोन करुन दिली होती. याबाबत सुरुवातीला कोणाला काही माहिती नव्हती.

आजोबांचा मृतदेह घरात असताना त्यांची नात छप्परावर लपल्याने पोलिसांनी आधी या मुलीवरच संक्षय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. चौकशीत मुलगी कधी ही तिच्या प्रियकराचे नाव घेत होती तर कधी एका टॅक्सी चालकाचे नाव घेत होती.

पोलिसांनी या मुलीच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केला. या तांत्रिक तपासाच्या आधारावर तिला पुन्हा चौकशासाठी पोलिसांना बोलावून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. या घटनेने कुटुंब हादरले असून याबाबत चौकशी सुरू आहे.