माढ्यात मोहिते पाटलांचे ठरलं? निंबाळकरांच्या विरोधात पवारांकडून उतरणार मैदानात? कार्यकर्ते आक्रमक…

भाजपकडून लोकसभेची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. याठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते, त्यांनी तशी तयारी देखील केली होती.

त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी घ्यावी, अशी मागणी समर्थकांकडून होत आहे. यामुळे आता मोहिते पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याठिकाणी फलटणचे रामराजे निंबाळकर देखील आपल्या घरात उमेदवारीसाठी आग्रही होते, मात्र त्यांना देखील उमेदवारी मिळाली नाही. यामुळे यावेळी रणजित निंबाळकर यांचे काम हे दोन गट करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, निंबाळकरांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांचा विरोध होता. त्यामुळे आता मोहिते पाटील गट मात्र नाराज झाला आहे. गेल्या काही काळापासून मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर असा संघर्ष सुरू आहे. यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, आता माघार घेऊ नका, बंडखोरी करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी धौर्यशिल मोहिते पाटलांकडे केली आहे. यामुळे त्यांच्या निर्णयावर याठिकाणी खासदार कोण होणार हे ठरणार आहे. याचा फायदा शरद पवार घेऊ शकतात.

माढ्यामध्ये सुरुवातीपासूनच मोहिते पाटलांनी आपल्यासोबत यावं असा सूर शरद पवारांचा असल्याचं समजतंय. यामुळे शरद पवार याठिकाणी डाव टाकणार का? हे देखील येणाऱ्या काळात दिसून येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी महादेव जानकर देखील इच्छुक आहेत.