विधानसभेत फाइलमध्ये ठेवले पैसे, भाजप आमदाराचा धक्कादायक व्हिडिओ झाला व्हायरल, नेमकं काय घडलं?

काल पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहातील भाजपच्या महिला आमदाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या हातात पैसे असल्याचे दिसून आले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत. हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. यामुळे हे पैसे नेमकं कशासाठी दिले याची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. भाजप आमदार राजेश पवार बोलत असताना पाठीमागच्या बाकावर भाजप आमदार मेघना बोर्डीकर बसलेल्या आहेत.

यावेळी त्या एका फाईलवर स्वाक्षरी करतात. स्वाक्षरी केल्यानंतर त्या पैसे काढतात आणि त्यातील काही नोटा फाईलमध्ये ठेवतात. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली. औषधं आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते, असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत त्या म्हणाल्या, सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधं आणण्यासाठी १००० रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले.

त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.