विवाहितेने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. श्रीरामपूरमध्ये ही घटना घडली आहे. टाकळीमियात ही घटना घडली.
आजारपणाला कंटाळून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
मायलेकीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विद्या दिलीप कडु (वय 25) आणि सिध्दी दिलीप कडु (वय 4) असे आत्महत्या केलेल्या मायलेकीचे नाव आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. विद्याची श्रीरामपूर येथील दवाखान्यात मासिक ट्रिटमेंट चालू होती.
विद्या थोडीशी मनोरुग्ण होती. तिला तिला अनेक दिवसांपासून औषधोपचार चालु होते. मात्र यामुळे ती टेंशनमध्ये असायची. अनेकदा ती याबाबत बोलून दाखवत होती. ती सुमारे तीन वर्षापासून टाकळीमिया येथे माहेरी राहत होती.
यामुळे ती नैराश्यात गेली होती. विद्या ही या औषधोपचार आणि इंजेक्शनला पूर्णपणे वैतागली होती. तिने संधी साधून आपल्या लहान चिमुकलीला घेऊन जवळच असलेल्या विहीरीत उडी घेत आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. पोलीस देखील याठिकाणी दाखल झाले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यामुळे कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. यामध्ये चिमुकली देखील असल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले.
दरम्यान, अशीच एक घटना नाशिकमध्ये देखील घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बाळाची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.