आईने स्वत:चा जीव धोक्यात घालत बाळाचा वाचवला जीव; भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

आई आणि बाळाचं नातं खुप खास असतं. बाळ आजारी असेल तर आईला झोपही लागत नाही. आई आणि बाळाच्या नात्याचे मजेशीर व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता एक वेगळाच व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडिओमध्ये आई आणि बाळ एका घरात असतात. त्यावेळी अचानक घराचं छत कोसळतं. तेव्हा बाळाला वाचवण्यासाठी आई जे काही करते ते आता चर्चेचा विषय ठरले आहे. हा व्हिडिओ खुप व्हायरल झाला असून सर्वजण त्या आईचे कौतूक करत आहे.

अपघात हा कधीही सांगून होत नसतो, तसेच तो कधी होईल याचा विचारही आपण केलेला नसतो. अशाच एका भयानक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये एक आई आपला जीव धोक्यात घालून आपल्या बाळाचा जीव वाचवताना दिसून येते.

एक लहान बाळ बेबी वॉकरमध्ये बसलेले असते. त्याचवेळी घराचे छत खाली कोसळते. त्यावेळी आपला जीव धोक्यात घालून ती आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी धाव घेते. संबंधित व्हिडिओ हा कंबोडियातील असल्याचे म्हटले जात आहे.

घराचं छत हे कोसळत असतं. तेव्हाच त्या महिलेला याची जाणीव होऊन जाते. त्यावेळी आणखी दोन मुलांना घेऊन आई बाजूला होते. पण बेबी वॉकरवरच लहान बाळ तिथेच असतं. तेव्हा आई धावत जाऊन त्या बाळाला आपल्याकडे ओढते आणि त्याचा जीव वाचवते.

व्हिडिओमध्ये दिसणारे दृष्य हे खुपच भितीदायक आहे. आई त्या बाळाला कसे वाचवते हे त्या व्हिडिओमध्ये दिसून येते. तसेच थोडा जरी उशीर झाला असता तर मोठा अपघात झाला असता. पण आईने तसे होऊ दिले नाही आणि बाळाला वाचवले.