जर आई-बहिण काढत असेल…’, फडणवीसांच्या वक्तव्यामुळे जरांगे आक्रमक, म्हणाले, आमच्या आयांच्या छाताडावर…

सध्या मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तीन जिल्ह्यात जाळपोळ झाली असून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामुळे मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. याबाबत आज देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलत असताना त्यांनी थेट इशाराच दिला. ते म्हणाले, जर कोणी कोणाची आई-बहिण काढत असेल तर विरोधी पक्षाचा किंवा सत्ताधारी पक्षाचा सदस्य असो, हा देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी उभा राहिल.

कोणासोबत त्यांचे फोटो बाहेर येत आहेत, एक एक गोष्ट बाहेर येत आहे. कोणी कोणाची आई-बहिण काढत असेल तर विरोधी पक्षाचा किंवा सत्ताधारी पक्षाचा सदस्य असो,हा देवेंद्र फडणवीस पाठीशी उभा राहिल. जरांगे पाटील यांच्याबाबत मला काही बोलायचं नाही. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे माहिती आहे.

तसेच वॉर रूम कोणी उघडली याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे वॉर रूम कुणी सुरु केली, याबाबत सखोल चौकशी करून षडयंत्र शोधून काढू, असा इशाराच त्यांनी दिला. यामुळे जरांगे देखील आक्रमक झाले.

दरम्यान, याबाबत मनोज जरांगे देखील आक्रमक होत म्हणाले, आमच्या आया- बहिणीच्या छाताडवर नाचलात, गोळ्या घातल्या तेव्हा वाईट वाटलं नाही का? आणि आज वाईट वाटत आहे.

आमच्या आई-बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिला आणि वरुन हाणलं. 20 पोलीस एका महिलेला मारहाण करत होते. उचलून आपटता का, विटा डोक्यात हाणता त्याच्या. तेव्हा कुठे गेलेला तुम्ही, असेही जरांगे पाटील म्हणाले. यामुळे हा वाद आता वाढतच चालला आहे.