माणगावात आढळलं सर्वात दुर्मिळ हरीण, नावही आहे भन्नाट; वैशिष्ट्ये काय?

राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वेगवेगळे प्राणी जंगलातून बाहेर पडून गावाजवळ येताना दिसत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील माणगावात एक हरीण दिसून आले आहे. ते मूषक हरीण असल्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा होत आहे.

माणगावातील बाजारपेठेतील व्यापारी कृष्णाभाई गांधी यांच्या दगडी बिल्डिंग मागील परीसरात ते छोटेसे हरीण आढळून आले होते. त्यानंतर याबाबत वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना याबाबत माहिती देण्यात आली होती.

त्यानंतर शंतनु आणि त्यांचे सहकारी त्याठिकाणी दाखल झाले. वनविभागालाही याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांची टीम देखील त्याठिकाणी दाखल झाली होती. त्यानंतर त्या सर्वांनी त्याचा शोध घेतला. पण ते हरीण काही मिळाले नाही.

स्थानिक नागरिकांना याबाबत काही सुचना देण्यात आल्या होत्या. ते हरीण पुन्हा दिसले असता त्याच्या जवळ न जाता लगेच कळविण्याचे आवाहन वनविभागाने आणि शंतनु यांनी केले होते. त्यानंतर दुसऱ्यादिवशी पुन्हा ते हरीण तिथे दिसून आल्यानंतर त्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती.

शंतनु आणि त्यांचे सहकारी मित्र शुभांकर यांनी त्या हरीणाची पाहणी केली आहे. त्यामध्ये तो प्राणी माऊस डियर म्हणजेच मूषक हरीण असल्याचे समोर आले. या हरीणाला पिसोरी म्हणून ओळखले जाते. या हरीणांचा स्वभाव खुप लाजरा असतो.

पुराच्या पाण्यामुळे ते अडकले असावे आणि त्यामुळे ते वस्तीत आले, असा अंदाज आहे. ते ज्याठिकाणी दिसून आले. तिथे भटक्या कुत्र्यांचा खुप वावर आहे. त्यामुळे त्याचा बचाव करणे गरजेचे होते. त्यामुळे हरीणाला पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी नेणे गरजेचे होते. आता शंतनु यांनी वनविभागाच्या मदतीने त्या हरीणाला जवळच्याच जंगलात सोडले आहे.

ते हरीण ४ वर्षांचे होते. मूषक हरीण हा अतिशय दुर्मिळ आणि लाजरे हरीण आहे. ते मनुष्यवस्तीपासून खुप लांब राहतात. ते हरीण पळायला खुप चपळ असतात, ही त्या हरीणाची वैशिष्ट्ये आहे. स्थानिक लोकांमुळे आणि गांधी परिवाराच्या मदतीमुळे त्या हरीणाचे वनविभागाला प्राण वाचवता आले आहे.