लिहिता न येणाऱ्या खासदाराची थेट मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी, कार्यक्रमात असं काय लिहिलं की सगळेच हादरलेच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा नीट लिहिता आली नाही. त्यांनी लिहिले – बेढी पडाओ, बच्चाव. यामुळे आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.

ठाकूर या मोदी मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली घोषणाच नीट लिहिता आली नाही. याचा फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. काँग्रेस नेत्यांनी यामुळे त्यांच्यावर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्र्यांना चार शब्दांची घोषणा देखील अचूक लिहिता न आल्याचा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने यावरुन मंत्र्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत माहिती अशी की, धार जिल्ह्यातील ब्रह्मा कुंडीस्थित शाळेत १८ जूनला ‘स्कूल चलो अभियाना’च्या अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पाहुण्या म्हणून धार लोकसभेच्या खासदार सावित्री ठाकूर यांना बोलावण्यात आले होते. यावेळी फळ्यावर लिहिताना हा प्रकार समोर आला आहे. त्या मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास खात्याच्या राज्यमंत्री आहेत. यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

व्हिडीओमध्ये सावित्री ठाकूर पांढऱ्या फळ्यावर ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची घोषणा चुकीच्या पद्धतीने लिहिल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओवरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. के मिश्रा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तींना आणि मोठ्या विभागांची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तींना त्यांचीच मातृभाषा येत नाही. ही माणसं त्यांचं मंत्रालय कसं चालवू शकतात? असा प्रश्न आता काँग्रेसने उपस्थित केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.