MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीला जवळच्या मित्रांनीच फसवलं, करोडोंना लावला चुना, नेमकं काय घडलं? वाचा..

MS Dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या एका फसवणुकीच्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. मिहिर दिवाकर हा धोनीचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जातो. तो धोनीचा बिझनेस पार्टनरही आहे. मिहिरने धोनीबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

आता धोनीने अरका स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडच्या मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वासविरुद्ध रांची कोर्टात अपराधिक तक्रार दाखल केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत माहिती अशी की, मिहिर दिवाकरने जगभरात क्रिकेट अकॅडमी सुरु करण्यासाठी धोनीबरोबर करार केला.

असे असताना या करारतील अटींचे मिहिरने पालन केले नाही. करारानुसार अरका स्पोर्ट्स फ्रेंचाईजीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात समान विभागनी केली जाणार होती. मात्र तसे झाले नाही. यामुळे हा वाद निर्माण झाला. यामध्ये मिहिरने कोणत्याही नियम आणि अटिंची पूर्तता केली नाही.

धोनीचे वकिल दयानंद सिंह यांनी या प्रकारात धोनीला 15 कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. धोनीच्या कायदे विभागाने मिहिर दिवाकरला अनेक नोटिसा पाठवल्या. पण त्याला कोणतंही उत्तर मिळालं नाही. यामुळे प्रकरण कोर्टात गेलं.

तसेच टीम इंडियाचा विकेटकिपर ऋषभ पंतला त्याच्या जवळच्या व्यक्तीनी फसवले आहे. मृणांक सिंह असे त्या व्यक्तीचे नाव आहे. 25 डिसेंबरला त्याला पोलिसांनी अटक केली. याबाबत तपास सुरू आहे.

मृणांक सिंहने अंडर-19 राज्य क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मृणांकने ऋषभ पंतला महागडी घड्याळ स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी त्याने पंतकडून 1.63 कोटी रुपये घेतले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.