Mumbai Accident : ट्रिपल सीट प्रवास करणं बेतलं जीवावर, मुंबईत भीषण अपघातात २ तरुणींसह तिघे जागीच गेले..

Mumbai Accident : मुंबईत एक भीषण अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी बाईक आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात परळ ब्रिजवर झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला जोरदार आदळली. बाईकवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्यांना तिघांचाही यात मृत्यू झाला आहे. तनिष पतंगे (वय 24), रेणुका ताम्रकर ( वय 25 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मृतांमध्ये दोन तरुणींसह एका तरुणाचा समावेश आहे. साउथ बॉण्डने प्रवास करत असताना डिव्हायडरला धडक बसून नॉर्थ बॉण्डने जाणाऱ्या डंपरवर बाईत धडकली. हा अपघात खूपच भीषण होता.

परेल ब्रिजवर दामोदर हॉल समोर सकाळी ही घटना घडली आहे. बाईकवरुन दोन तरुणी आणि एक तरुण प्रवास करत होते. या अपघातात बाईकच्या समोर भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. यावेळी घटनास्थळी गर्दी झाली होती. पोलिसांनी यावेळी वाहतूक कोंडी व्यवस्थित केली.

तसेच ट्रकच्या समोरील भागाचे देखील नुकसान झाले आहे. पोलीस याबाबत माहिती घेत आहेत. धडकेनंतर बाईकवरील तिघांना रस्त्यावर पडून डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.

या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज बघितले जात आहेत. यावरून अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती समोर येईल. पोलीस याबाबत तपास करत आहेत. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत.