Mumbai crime : मुंबईत एका धक्कादायक घटनेचा छडा लागला आहे. 2001 मध्ये कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या अग्नीकांडात 48 वर्षांचे जहराबी आणि तिचे पती अब्दुल रहमान यांचा जळून मृत्यू झाला होता. या घटनेतील फरार आरोपी असलेल्या यशवंत बाबूराव शिंदे याला 22 वर्षांनी अटक करण्यात आले आहे.
22 वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरवून सोडले होते. चहाच्या दुकानात जोडप्याला जिवंत जाळण्यात आले. या प्रकरणात आता अखेर 22 वर्षांनी न्याय झाला आहे. यापूर्वी पोलिसांनी आरोपी शिंदेंचे सहकारी मोहिद्दीन शेख, नागनाथ तेलंगे आणि व्यंकट पाचवाड या आरोपींना अटक केली होती.
असे असताना मात्र मुख्य आरोपी यशवंत शिंदेंला मात्र शोधू शकले नव्हते, मात्र आता पोलिसांना यश आले आहे. काही दिवसांपासून आरोपीच्या लातूर गावात शोधमोहिम आखली होती. पोलीस याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती.
त्याठिकाणी त्यांना आरोपी गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोंढवामध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपीला अटक केली आहे. आरोपी यशवंत पेटिंगचे काम करायचा. त्याचे जहराबी आणि अब्दुलच्या मुलीवर प्रेम जमले तिच्यासोबत त्याला लग्न करायचे होते.
असे असताना मात्र, तिच्या आई-वडिलांनी नकार दिला. त्यांनी एक दोन वेळा यशवंतला मारहाणही केली. त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न दुसरीकडे ठरवले. यामुळे यशवंत संतापला आणि रागाच्या भरात आई वडील हॉटेलमध्ये झोपले असताना हॉटेलला आग लावली.
यातच त्यांचे निधन झाले. नंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली. मात्र त्याचा काहीच तपास लागला नाही. तो अनेक ठिकाणी राहिला त्याने लग्न देखील केले. नंतर 22 वर्षांनंतर त्याला अटक करण्यात यश आले आहे.