Mumbai News : भविकांनो सावध व्हा! देवाच्या दारात होतेय लूट, सिद्धिविनायक मंदिरात भयंकर प्रकार आला समोर

Mumbai News : मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी दर दिवशी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळते. देशातून अनेक भाविक याठिकाणी येत असतात. त्यातही सुट्ट्यांच्या दिवशी तर इथं गर्दीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले असत.

असे असताना आता येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सिद्धिविनायक मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

सिद्धिविनायक मंदिरात पैसे आकारत सिद्धिविनायकाचे VVIP दर्शन देणाऱ्यांच्या रॅकेटचे बिंग फुटले आहे. यामुळे भाविकांना एकच धक्का बसला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

आता या रॅकेटमध्ये किती जणांचा सहभाग आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी चौकशी देखील सुरू केली आहे. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. मंदिरात मुखदर्शन, गाभाऱ्यातील दर्शन रांग तिथं गेलं असता नजरे पडते.

दरम्यान, मंदिरात व्हीव्हीआयपी दर्शन रांग, गणपतीच्या पूजेच्या नावानं एक बनावट वेबसाईट तयार करण्यात आली. त्यामधून अनेकांची फसवणूक केली गेली. त्यातून नागरिकांची लूट करण्यात आली. अनेकांना ते खरे देखील वाटले. यामुळे यामध्ये अनेकजण फसले.

या वेबसाईटच्या माध्यमातून दर्शनाच्या नावाखाली काही कर्मचारी आणि दलालांकडून हजार ते तीन हजार रुपये घेत व्हीव्हीआयपी रांगेतून दर्शन करुन दिले जात होते. मात्र मंदिर प्रशासनाकडून अस काही नसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर सगळे जागे झाले. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून मंदिर समितीकडून देखील अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली. या घटनेमुळे किती फसवणूक झाली आहे याबद्दल अजून माहिती समोर आली नाही.