मोदींच्या सभेत मुनगंटीवारांचा तोल सुटला, नको तेच बोलून गेले, भाषण ऐकून महिलांची मान शरमेने खाली…

चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा सध्या जोरदार प्रचार सुरू झाला आहे. यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला. यामुळे सध्या याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला. त्यामुळे उपस्थित महिलांना देखील खाली बघावे लागले. सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीपूर्वी मुनगंटीवार यांनी भाषण केले.

यावेळी मुनगंटीवार यांनी बहीण-भावाचा नात्याबाबत असभ्य भाषा वापरली. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात भाऊ-बहिणींना गळफास लावणारा आणि एकाच बेडवर भाऊ-बहिणींना विवस्त्र झोपवणारा पक्ष असे वर्णन केले. त्यांची भाषा ऐकून उपस्थित लोकांना देखील धक्का बसला.

याबाबतचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ही क्लिप लोकांपर्यंत पोहोचल्याने आता जिल्ह्यातून या भाषणाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनेकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रचार सभेत त्यांच्या तोल ढासळत असल्याचे दिसत आहे. पराभवाची भीती मुनगंटीवार यांच्यावर हावी झालीय काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यामुळे याठिकाणी असलेली लोकं महिला देखील मोठ्या प्रमाणावर नाराज झाल्या आहेत.

यामुळे मुनगंटीवार यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याचा फटका बसणार असल्याची चर्चा याठिकाणी सुरू आहे. यामुळे आता प्रत्यक्षात निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा व्हिडिओ बघून मात्र अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.