गेल्या काही दिवसांपासून बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिरापी पूजा खेडकर चर्चेत आहे. नियमाबाह्य गोष्टी केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. असे असताना तिचे वडील दिलीप खेडकर यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत दिलीप खेडकर म्हणाले, आपल्या मुलीवर झालेले आरोप खोटे आहेत. आपल्याविरोधात एफआयआर दाखल असल्याने दबाव होता. त्यामुळे आपण इतके दिवस समोर येऊ शकलो नाही, असा खळबळजनक आरोप दिलीप खेडकर यांनी केला आहे. त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
याबाबत ते म्हणाले, माझी मुलगी पूजा खेडकर हिच्या बाबतीत जी माहिती दिली गेली, ती वस्तुस्थितीला धरून नाही. तिच्या बाबतीत एक फ्रॅाड मुलगी म्हणून सिलेक्शन झाल्याची माहिती गेली ती चुकीची आहे. तिचे आयुष्य उद्ध्वस्थ झाले आहे. याला अनेक कारणे आहेत. ती समोर येणे आवश्यक आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाली. प्रस्थापितांना वाटत होतं उभं राहू नये. या नेत्यांनी मुद्दाम त्रास दिला. विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
तसेच ते म्हणाले, माझ्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला होता म्हणून मला समोर येता आले नाही, असं दिलीप खेडकर म्हणाले. यामुळे आता या प्रकरणाचा वेगळं वळण लागले आहे. यावर विखे पाटील यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
पुढे ते म्हणाले, पूजा खेडकर ही वंजारी आहे. ओबीसी प्रमाणपत्र खोटं नाही. त्या वर्गवारीत जे ॲटम्प्ट दिले ते योग्य आहे. पर्सन विथ बेंचमार्कमध्ये ३०-४० आजार आहेत. ॲाम्लोपिया हा आजार पूजा खेडकरला आहे, असा मोठा खुलासा देखील त्यांनी केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.