माझ्या नवऱ्याचं माझ्याच आईसोबत अफेअर होतं!! महिलेने सगळंच सांगितलं, उडाला गोंधळ…

एक प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये जन्मदाता आईनेच मुलीचा संसार उद्धवस्त केला आहे. या महिलेने एका व्हिडीओद्वारे तिच्या आयुष्यातील घटनेबद्दल सर्वांना सांगितलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

यामध्ये ही महिला म्हणाली की, तिच्या नवऱ्याचे तिच्याच आईसोबत अफेअर सुरु होते. हे जेव्हा तिला कळलं तेव्हा तिला धक्काच बसला. लेसी जेन असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने या व्हिडिओच्या माध्यमातून एक धक्कादायक प्रकार सांगितला आहे.

या विडिओमध्ये ती महिला म्हणाली की, मुलीच्या जन्माच्या वेळी तिची आई तिच्याकडे राहायला आली. आईने घराजवळच एक घर भाड्याने घेतले. याठिकाणी ती राहू लागली. रोज तिचा नवरा आणि तिचीच आई सोबत कामाला जायचे. 

या महिलेने एका मुलीला जन्म दिला. पण तिला या प्रेग्नेंसीमध्ये अनेक आरोग्याशी संबंधित आजारपणाशी झुंज द्यावी लागली होती. तिला तिच्या आईवर आणि नवऱ्यावर संशय आला. तिचे पती आणि आईचे जवळपास 14 वर्षांपासून अफेअर सुरु आहे.

ती म्हणाली, ज्यावेळी मुलीच्या जन्माच्या वेळी आई राहिला आली होती. त्यावेळी तिने मला सांगितले की, तिच्या नवऱ्याचे अनेक महिलांसोबत अफेअर आहे. यामुळे मला धक्काच बसला. मात्र मात्र तू हे तुझ्या नवऱ्याला सांगू नकोस, असे ती म्हणाली.

तिने मात्र नवऱ्याला या सगळ्याबद्दल विचारले. तू माझी फसवणूक करत आहेस का? असा थेट सवाल तिने नवऱ्याला केला. त्यावेळी रागाच्या भरात तिचा नवरा म्हणाला मग तुझ्या आईला जाऊन विचार की, तिचा आणि माझ्या काय संबंध आहे ते आमचं काय नातं आहे? यामुळे तिला मोठा धक्काच बसला.

तिने आईला विचारल्यानंतर तिच्या आईला घाम फुटला. तिने आईला घर सोडण्यासाठी सांगितले. तिची आई म्हणाली, माझं माझ्या जावयाशी नाते आहे पण आमचं पूर्ण अफेयर आहे असं म्हणता येणार नाही. मुलीने मात्र नवऱ्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला.

तिने या घटनेनंतर नवऱ्याला घटस्फोट दिला असून ती आपल्या मुलीचा एकटीने सांभाळ करत आहे. ही घटना उघडकीस आली तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. यातून तिने स्वतःला सावरलं आणि मुलीचा संभाळ ती करत आहे.