माझ्या मुलाची काहीच चूक नव्हती, त्याला अमानुषपणे का मारलं? आईचा काळीज पिळवटणारा आक्रोश…

तीन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. ते जबलपूरचे होते. यामुळे कारवाईची मागणी होत आहे. या घटनेची माहिती या दोघांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली तेव्हा त्यांनी एकच आक्रोश केला.

अश्विनी कोस्टा आणि अनिस अहुदिया असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच अनिसच्या आईला मोठा धक्का बसला. माझा मुलगा मला परत द्या. माझा मुलगा मला सोडून गेला त्याची काय चूक होती. त्याची काहीच चूक नव्हती, तरी माझ्या मुलाची काय चूक होती की त्याला एवढ्या अमानुषपणे का मारले? मेरा बच्चा अच्छा था, असे म्हणत आक्रोश केला.

दरम्यान, माझा मुलगा तीन वर्षापासून पुण्यात होता. तो अतिशय गुणी होता. आमच्यापासून दूर असला तरी आमची काळजी घ्यायचा. रविवारी रात्री मला त्याच्या मित्रांचा फोन आला. त्याचे मित्र म्हणाले, काकू अनिसच्या बाबांना फोन द्या आम्हाला त्यांच्यशी बोलायचे आहे. अनिसचा अपघात झाला तो सिरिअस आहे, असे सांगितले.

यावेळी आम्हाला धक्काच बसला. त्यानंतर काही वेळातच त्या मृत्युची खबर आली. तो माझी, त्याच्या लहान भावाची तसेच पूर्ण कुटुंबियांचा आधार होता, असेही आईने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी केलेली कारवाई आणि कोर्टानं आरोपीला दिलेला तातडीचा जामीन, यामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

याप्रकरणी वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेली अश्विनी कोस्टा हिचं वर्क फ्रॉम होम सुरु होते. या दिवशी तिची आई तिला म्हणाली की कंटाळा आला असेल तर जरा बाहेर फिरुन ये, रिफ्रेश होशील. यामुळे ती तिच्या मित्रांसोबत पार्टी करायला गेली होती. मात्र घटनेची माहिती त्यांना मिळाली तेव्हा त्यांना एकच धक्का बसला.

अश्विनीच्या आईने रुग्णालयात पोहोचताच टाहो फोडला. ती तिच्या वडिलांच्या वाढदिवशी जबलपूरला घरी जाणार होती, मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ती तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जबलपूरला आपल्या घरी जाणार होती.