Nagpur News : नागपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करण्यात आला आहे. पंकज चंद्रकांत कडू (२७, रा. सोनेगाव) आणि सरिता शेखर कनोजिया (४०,रा. जयताळा) अशी आरोपींची नावे आहेत.
शेखर बबलू कनोजिया (४७, रा. जयताळा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सरिता आणि शेखर यांचे लग्न झाले होते. त्यांना अपत्यही आहे. असे असताना सरिता पंकजच्या संपर्कात आली. यानंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. यातून पती पत्नीची भांडणे व्हायला लागली.
ते दोघे भेटत असल्याची माहिती पतीला मिळात होती. यामुळे पती पत्नीला याबाबत विचारणा करत होता. मात्र ती उडवाउडवीची उत्तर देत असल्याने त्यांच्यात वाद वाढत गेला. या दोघांच्या अनैतिक संबंधांवर पतीला राग अनावर झाला.
यावरून पती पत्नींमध्ये वाद सुरू झाले. हे वाद दररोज वाढत असताना शेखरचा काटा पत्नीने काढायच ठरवलं. तिने पंकजच्या सहाय्याने त्याच्या हत्येचा कट रचला. त्यांनी त्याचे अपहरण करून त्याला मारहाण केली. यातच त्याचे निधन झाले.
पोलिसांनी चौकशीअंती आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पत्नी आणि तिच्या प्रियकराला सत्र न्यायाधीश आर. आर. भोसले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, नागपुरमध्ये कमी वयाच्या प्रियकरासाठी पत्नीने पतीला संपवल्याची घटना घडल्याने याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून तपास केला.