Nana Patekar : नाना पाटेकर राजकारणाच्या आखाड्यात? पुण्यातील ‘या’ मतदारसंघातून उतरणार रिंगणात

Nana Patekar : सध्या लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असे असताना आता सिनेसृष्टीतील कलाकार निवडणुकीला उतरणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.

अशातच अभिनेते नाना पाटेकर राजकीय मैदानात उतरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून अभिनेते नाना पाटेकर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

एका वृत्तवाहिनीवर बोलताना नाना पाटेकर यांनी राजकारणाबाबत काही मतं व्यक्त केली होती. त्यानंतर सदर चर्चा सुरू झाली आहे. तसेच, गणपती दर्शनाला गेलेल्या अजित पवारांकडेही नाना पाटेकर यांनी खडकवासल्यातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.

घेरा सिंहगड येथे नाना पाटेकर यांचे फार्महाऊस आहे. याठिकाणी शेतीसाठी बराच काळ पाटेकर यांचा येथे मुक्काम असतो. यामुळे नाना पाटेकर तयारी करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे खरंच नाना पाटेकर निवडणूक लढवणार की या चर्चा हवेत विरुन जाणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. एका कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी कुणीच नसल्याचे विधान नाना पाटेकर यांनी केले होते.

नाना पाटेकर यांच्या विधानावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पाटेक हे निवडूक लढणार आहे. अशी चर्चा जोरदार सुरु आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.