Nanded Crime News: विमा एजंटने पळवले घरातील सोने आणि पैसे; दिवसाढवळ्या घरात घुसला अन् महीलेला म्हणाला…

Nanded Crime News: नांदेडमध्ये चोरीची एक घटना घडली आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका व्यक्तीने विमा एजंट बनून महिलेच्या घरात घुसून चोरी केल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीने घरात घुसून महिलेला मारहाण करत मौलव्यान वस्तू चोरी केल्या. याबाबत तपास सुरू आहे.

व्यंटकेश नगर परिसरात ही घटना घडली आहे. चोराच्या हल्ल्यात ही महिला जखमी झाली आहे. शुभांगी दोडके असर या जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलीस याठिकाणी दाखल झाले.

भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रकार घडला. शुंभागी दोडके या घरात एकट्या होत्या. दुपारी अनोळखी माणूस विमा एजंट बनून व्यंकटेशन नगरमध्ये फिरत होता. त्याने परिसरात जाधव यांचे घर कुठे आहे , अशी विचारणा केली.

त्यानंतर या व्यक्तीने शुभांगी दोडगे यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र त्यांच्या लक्षात काही आले नाही. त्यांनी देखील दरवाजा उघडला. त्याने महिलेला धक्का दिला. त्यानंतर घराची आतून कडी लावली.

तसेच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवाण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने त्याचा विरोध केला. त्यांनी आरडाओरडा करण्याचा देखील प्रयत्न केला. त्या व्यक्तीने महिलेच्या डोक्यात वार करून घरातील सोनं मोबाईल आणि मौल्यवान वस्तू देखील घेऊन तो फरार झाला.

नंतर महिलेने शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर याठिकाणी पोलीस देखील दाखल झाले आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिस सीसीटीव्ही आधारे तपास करत आहेत.