क्राईम

Nashik news : तरुणीने लग्नाला दिला नकार, संतापलेल्या तरुणाने सूड उगवत केलं भयंकर कृत्य, नाशिक हादरलं..

Nashik news : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील काठे गल्लीत दोघांकडून एका अपार्टमेंटमधील चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी अशा सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत माहिती घेऊन पोलिसांनी लगेच दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून ती राहत असलेल्या अपार्टमेंटमधील वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

यामध्ये चारचाकी वाहनासह रिक्षा आणि दुचाकींचे नुकसान झाले आहे. सुमित पगारे याने तरुणीशी ओळख वाढवून संबंध प्रस्थापित करून विवाह करण्याची मागणी केली होती. असे असताना तरुणीने त्यास नकार दिला. यामुळे त्याला राग आला.

त्याचा मित्र संशयित विकी जावरे याच्या मदतीने तरुणीच्या दुचाकीसह अन्य दुचाकी चारचाकी आणि रिक्षाची जाळपोळ करून नुकसान केले. याबाबत घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच आरोपीने मुलीच्या भावाला मारहाण केली.

रात्रीच्या सुमारास पुन्हा त्याठिकाणी येऊन वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळपोळ केली. यामध्ये अनेक वाहने जळून खाक झाली होती. यापूर्वी देखील संशयित पगारे याने तरुणीच्या दुचाकीची तोडफोड केली होती.

याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यात दोघे संशयित आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button