गदरचा शो ठरला शेवटचा! सिनेमा पाहून थिएटर बाहेर आला, तेवढ्यात ८-१० जण आले अन्…; पुण्यात थरार

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. कोयता, तलवारीने होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये काही लोकांना तर आपला जीवही गमवावा लागला आहे.

अशीच एक घटना आता समोर आली आहे. मंगलाा टॉकीजसमोर एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. तरुण चित्रपट पाहून बाहेर आला होता. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आहे.

तरुण टॉकीजमधून बाहेर आल्यानंतर काही तरुणांनी त्याच्यावर कोयत्याने आणि तलवारीने हल्ला केला. त्यानंतर त्याच्यावर दगडही घातला. या भयानक हल्ल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

नितीन मोहन म्हस्के असे त्या तरुणाचे नाव होते. तो फक्त २६ वर्षांचा होता. याबाबत माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता आरोपींचा शोध सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के हा रात्री शिवाजीनगर येथील मंगला टॉकीज येथे चित्रपट पाहण्यासाठी आला होता. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर काही तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

टॉकीजमधून बाहेर आल्यानंतर काही तरुणांनी त्याच्यावर कोयता आणि तलवारीने हल्ला केला. त्यानंतर दगडानेही त्याला मारहाण केली. गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. नितीन म्हस्केवर आधीच कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

काही दिवसांपूर्वी नितीन आणि त्याच्या काही साथीदारांनी आरोपी सागरवर हल्ला केला होता. त्यांनी सागरला मारहाण केली होती. त्यामुळे कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याप्रकरणी नितीन आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सागरने असे केल्याचे समोर आले आहे.