Crime News: आईच्या नव्हे वैरीण! फोनवर बोलत असताना सतत रडत होते बाळ, आईने केली हत्या, म्हणाली…

Crime News: आई ही आपल्या लहान बाळाची काळजी घेण्यासाठी सर्वकाही करत असते. आपल्या मुलावर काही संकट आले तर आपली आई जीवाची पर्वा न करता आपल्या जीवाची बाजी लावते. झारखंडच्या गिरिडीहमध्ये मात्र एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने तिच्या बाळासोबतच भयानक कृत्य केलं आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बाळ सतत रडत असल्यामुळं वैतागलेल्या आईनेच त्याचा निर्घण खून केला आहे. यामुळे उपस्थित सगळेच हादरले आहेत. याबाबत माहिती अशी की, आई फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होते.

यामुळे आईला फोनवर बोलण्यास अडचण येत होती. या रागातून तिने पोटच्या मुलाचा गळा घोटून जीव घेतला. दोन वर्षांच्या मुलाला त्याच्याच आईने दिलेली शिक्षा पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच आईचे इतके कठोर मन कसे झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यामुळे येथील नागरिकांनी महिलेला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महिला एका व्यक्तीशी फोनवर बोलत होती. त्याचवेळी तिचा दोन वर्षांचा मुलगा रडत होता. यामुळे महिलेला खूप राग येत होता. गोलगो या गावातील ही घटना आहे. 

मुलाला शांत करण्याऐवजी महिला संतापली आणि तिने पोटच्याच लेकाची गळा दाबून हत्या केली.  बऱ्याचवेळाने तिने दरवाजा उघडला जेव्हा तिचा पती आतल्या खोलीत गेला तेव्हा त्याने पाहिलं की मुलगा गप पडला होता. यामुळे त्याला संशय आला.

त्यानंतर त्यांने बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितले. कुटुंबीय लगेचच धावत खोलीत गेले अन् मुलाला घेऊन रुग्णालयात गेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.